मध्यप्रदेशात मालगाड्या समोरासमोर आदळल्या, अपघातानंतर इंजिनाने पेट घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशात मोठा अपघात घडला आहे. शहडोल येथील सिंहपूर रेल्वेस्थानकाजवळ दोन मालगाड्या समोरासमोर आदळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. अपघातानंतर इंजिनाने पेट घेतला आहे. घटनेनंतर तत्काळ रेल्वे प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले असून चालक जखमी झाला असून दोन कर्मचारी इंजिनमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली आहे.