
गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त सापडला. पोलिस दलातून नाराजीचा सूर उमटू लागल्यानंतर आज गृह विभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या 23 आयपीएस अधिकाऱयांबरोबर दोघा उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
अधीक्षक म्हणून कोणाची कुठल्या जिल्ह्यात वर्णी…
धनंजय कुलकर्णी (रत्नागिरी), पवन बनसोड (सिंधुदुर्ग), बसवराज तेली (सांगली), शेख समीर अस्लम (सातारा), अंकित गोयल (पुणे ग्रामीण), शिरीष सरदेशपांडे (सोलापूर ग्रामीण), राकेश ओला (नगर), एम. राजकुमार (जळगाव), रागसुधा आर (परभणी), संदीप सिंह गिल (हिंगोली), श्रीकृष्ण कोकाटे (नांदेड), सोमय मुंडे (लातूर), सारंग आवाड (बुलढाणा), गौरव सिंह (यवतमाळ), संदीप घुगे (अकोला), रविंद्रसिंग परदेशी (चंद्रपूर), नुरूल हसन (वर्धा), निखिल पिंगळे (गोंदिया), निलोत्पल (गडचिरोली), संजय बारकुंड (धुळे), श्रीकांत परोपकारी (ठाणे शहर), सचिन पाटील (संभाजीनगर), सिंगुरी आनंद (नागपूर ग्रामीण). तर मपोसे असलेले उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), पराग मणेरे (विशेष सुरक्षा विभाग, मुंबई).
याशिवाय मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रवीण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी.पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील-भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे व प्रवीण पाटील या भा.पो.से. तसेच निकेश खाटमोडे या राज्यसेवेतील अधिकाऱयांची बदली करण्यात आली असून त्यांच्या नव्यानियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
या अधिकाऱयांच्या बदल्या, पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निघणार
मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रवीण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी. पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील-भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे, प्रवीण पाटील, या भा. पो. से. अधिकाऱयांची आणि निकेश खाटमोडे, रा. पो. से. या अधिकाऱयांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.



























































