
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाचे मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती आज राज्याचे अल्पसंख्याकमंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी या निर्णयाची घोषणा केली.
नवाब मलिक म्हणाले, राज्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने 1 मेपर्यंत कडक लॉकडाउैन लागू केलेला असला तरी इतर उपाययोजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवरही लक्ष्य पेंद्रित केले आहे. 1 मेपासून लसीकरण पेंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही. अधिकाधिक लसींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला.
मागच्या कॅबिनेट बैठकीत लसींच्या दराबाबत चर्चा झाली. यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही होकार दिलेला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो कालच (शनिवारी) जाहीर केला आहे.
कोविशिल्ड लस पेंद्राला 150 रुपये, राज्याला 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपयाला मिळणार आहे. कोव्हॅक्सिनची पिंमतसुद्धा राज्यांना 600 रुपये व खासगी विक्रीसाठी 1200 रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे, असे नवाब मलिक म्हणाले.




























































