
राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ‘रुसा’च्या प्रकल्प संचालक पदी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तर राज्याच्या टुरिझम संचालक पदाची जबाबदारी आता मंगेश जोशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जोशी यांच्याकडे यापूर्वी यशदाच्या उपसंचालक पदाची जबाबदारी होती.
या निर्णयानुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी करण्यात आली आहे. तर कुशल जैन यांची नियुक्ती आता गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे. रेवैया डोंगरे यांची बदली यवतमाळच्या पांढरकवडा या उपविभागीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी पदी करण्यात आली आहे.



























































