मराठी शाळांना गुरुजींची गरज! जिल्हा परिषद शाळांमध्ये 11,798 शिक्षकांची पदे रिक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 11 हजार 798 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. 2025-26 च्या पवित्र पोर्टलवरील आकडेवारीनुसार, ही पदे रिक्त असल्याने मराठी शाळांना गुरुजींची गरज असून शिक्षक नसल्याने शाळांची शिक्षण गुणवत्ता धोक्यात आली आहे.

महायुती सरकारकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी अंतिम नियुक्त्या रखडल्याने शेकडो शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत आहे.

राज्यातील हजारो डीएड, बीएड, टीआयटी पात्र उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अद्याप पात्रता परीक्षा कागदपत्रे पडताळणी आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. जिल्हा परिषद शाळांमधील 11 हजार 798 पदे रिक्त असल्याने मराठी शाळांवर याचा निश्चित वाईट परिणाम होत आहे. अंतिम नियुक्त्या रखडल्याने शाळा बंद पडण्याच्या उंबरठय़ावर आहेत.

जिल्हा रिक्तपदे
पालघर 900
नाशिक 720
यवतमाळ 701
कोल्हापूर 606
चंद्रपूर 610
अमरावती 580
गोंदिया 558
ठाणे 523
पुणे 500
गडचिरोली 450
सोलापूर 525
सांगली 479
नागपूर 450
रायगड 445