स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लीडर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीत महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीत (लीडर ) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. राज्याला स्टार्टअप सुधारणांच्या श्रेणींमध्ये अन्य तीन स्थाने मिळाली आहेत.

केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीवर आधारीत निकालाची घोषणा (वर्ष 2019) व सत्कार समारंभ आज येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल, राज्यमंत्री ओम प्रकाश आणि सचिव गुरु प्रसाद मोहपात्रा उपस्थित होते. राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठी पाच श्रेणींमध्ये 22 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांना क्रमवारी देण्यात आली. महाराष्ट्राला स्टार्टअप योजनेच्या नियोजनबद्ध व प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये दुसऱया क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले.