तीन वर्षांत राज्यात 300 किमीचे मेट्रोचे जाळे; 2 लाख 80 हजार कोटींची गुंतवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पुढील तीन वर्षात 300 किमी लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारण्यात येणार आहे. या विविध मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल 2 लाख 80 हजार 755 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. यामध्ये मुंबईत वडाळा आणिक डेपो ते गेट वे आँफ इंडिया, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशा महत्वाच्या मेट्रो रेल्वेचा समावेश आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या  बैठकीत राज्यातील प्रस्तावित नवे मेट्रो प्रकल्प आणि सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांची माहिती देण्यात आली. सध्या राज्यात 174 कि.मी. मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाले असून 291 कि.मी. मार्गांवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. याशिवाय 130 कि.मी. मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत असून 87.15  कि.मी. मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

प्रस्तावित मेट्रो मार्ग आणि लांबी

मुंबई मेट्रो-11        17.51 कि.मी.

नवी मुंबई -1 ए आणि 2     17.09 कि.मी.

मुंबई मेट्रो-8          34.90 कि.मी.

मुंबई मेट्रो-10        9.20 कि.मी.

मुंबई मेट्रो-13        25.03 कि.मी.

मुंबई मेट्रो-12      18.40 कि.मी.

मुंबई मेट्रो-3 विस्तार   1.40 कि.मी.

मुंबई मेट्रो-14        45.15 कि.मी.

पुणे मेट्रो टप्पा -3    42 कि.मी.

अनावश्यक विलंबामुळे होणारी प्रकल्पातील खर्चवाढ टाळण्यासाठी काम सुरू झाल्यापासून मेट्रो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करा

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री