
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उष्ण आणि दमट हवामान आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिक मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 48 तासांसाठी १३ जिल्ह्यांत ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांत हवामान ढगाळ आणि दमट राहील. काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू शकते. तसेच, पुढील चार दिवस या कोकण, ठाणे, मुंबई, पालघार या भागात मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
17 Jul, Next 5 days alerts in the Maharashtra state by @RMC_Mumbai & @imdnagpur
So possibilities of weather with thunderstorms associated with lightning in thos districts at isolated pkaces with 🟡 alerts.
No 🟠 No 🔴
Recd from Thane DM group pl. pic.twitter.com/QxKOtd8h7p— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 17, 2026
राज्यातील शेतकरी अजूनही मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत. राज्यातील अनेक भागात तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.




























































