
महाराष्ट्राच्या युवा मल्लांनी 2 सुवर्ण व 4 रौप्य पदकांची कमाई करीत इतिहासात प्रथमच 15 वर्षांखालील राष्ट्रीय ग्रीको – रोमन कुस्ती स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या युवा संघाने प्रथमच बाजी मारल्याने हे विजेतेपद खऱया अर्थाने ऐतिहासिक ठरले. रांची (झारखंड) येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 38 किलो गटात ठाणे जिल्ह्याच्या ओंकार कराळेने रौप्य पदकाची कमाई केली. तो रुस्तुम–ए–हिंद अमोल बुचडे कुस्ती अकादमीमध्ये पै. अमोल बुचडे यांचा शिष्य होय. 41 किलो गटात कोल्हापूरच्या आदित्य जाधवने रौप्य पदक जिंकले. ठाणे जिह्याच्या प्रणय चौधरीने 52 किलो गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. हादेखील अमोल बुचडे यांचा पठ्ठा होय. 57 किलो गटात कोल्हापूरच्या तुषार पाटीलने नेत्रदीपक कुस्त्या करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मुंबईतील हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात अजय सिंग व अमोल यादव या वस्तादांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.





























































