
टीम इंडियाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा ब्ल्यू जर्सीत दिसला, पण यावेळी तो क्रिकेटच्या मैदानावर नाही, तर शूटिंग रेंजवर उभा होता. धोनी त्याच्या मूळ गावी रांचीमधील जेएससीए स्टेडियममध्ये गेला होता. त्यावेळी त्याने फलंदाजीसह नेमबाजीचाही आनंद घेतला. नेटमध्ये क्रिकेटचा सराव केल्यानंतर तो शूटिंग रेंजवर पोहोचला आणि तिथे गेल्यानंतर त्याने पिस्तूल हाती घेत निशाणा साधण्यास सुरुवात केली. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. माहीचा टेनिस पार्टनर असलेल्या सुमित कुमार बजाजने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.




























































