दै.‘सामना’चे महेश उपदेव यांना राजरत्न पुरस्कार

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल  दै. सामनाचे ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव यांना राजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारीला सायंकाळी 5.30 वाजता महाल येथील सिनिअर भोसला पॅलेसमध्ये हा पुरस्कार सोहळा होईल, अशी माहिती राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी  दिली.