
‘मेटा’च्या मालकीचा फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म ‘इन्स्टाग्राम’ आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फिचर आणते. इन्स्टाग्रामवरून शॉर्ट व्हिडीओ म्हणजेच रील्स बनवणाऱयांची संख्या मोठी आहे.
रील्सवर युजर्सना आतापर्यंत केवळ 60 सेकंदांपर्यंत व्हिडीओ बनवण्याचा पर्याय मिळत होता. आता कंपनी या वेळमर्यादेत वाढ करण्याच्या तयारीत असून 90 सेकंदांपर्यंतचे व्हिडीओ युजर्सना बनवता येतील. सध्या या फीचरची चाचपणी सुरू असून लवकरच युजर्सना ते उपलब्ध होईल.

























































