
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील संघर्ष काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता ममता बॅनर्जी यांनी थेट राज्यपालांना ट्विटरवर ब्लॉक केले आहे. राज्यपाल हे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना अशा पद्धतीने धमकावतात जसे ते त्यांचे वेठबिगारी कामगार आहेत. त्यांचे असे वर्तन मी स्वीकारू शकत नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. जगदीप धनखड यांनी 2019 साली पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारला आहे तेव्हापासूनच राज्यपाल विरुद्ध ममता बॅनर्जी यांचे सरकार यांच्यातील संघर्ष सुरू आहे.

























































