लातूर – हातात तलवार घेऊन फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला, स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हातामध्ये तलवार घेऊन फेसबुक वर फोटो अपलोड केलेल्या युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडील तलवारी जप्त करण्यात आली आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सोशल मीडियाद्वारे एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट दिसून आली, त्यामध्ये एक इसम हातामध्ये उघडी तलवार घेऊन फोटो काढून ते फेसबुकवर पोस्ट केले आहे.

त्यावर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व त्यांच्या टीमने नमूद इसमाचा शोध घेतला असता नमूद इसम हा गवळीनगर परिसरातील रोडवर मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव रवींद्रकुमार सुभाष अर्जुने (रा. गवळीनगर, लातूर) असे असून त्याच्याकडून फेसबुकवर तलवारी सहित पोस्ट फोटो मधील तलवार त्याच्याकडून जप्त करण्यात आली.

रवींद्रकुमार अर्जुन याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यशपाल कांबळे यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे विवेकानंद येथे गुरन 223/2021 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा व 135 मुंबई पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या कामगिरी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार रवी गोंदकर, खुर्रम काझी, यशपाल कांबळे यांचा सहभाग होता.