
घरगुती भांडणाचा राग आल्याने एका इसमाने थेट महावितरणच्या हाय व्होल्टेज टॉवर वर चढून वीज वाहक तार हातात धरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात घडली आहे.
त्या इसमास त्याच्या मित्रांनी समजूत काढत खाली उतरवले असून वीज प्रवाह खंडित झाला असल्याने त्या इसमाचा जीव सुदैवाने वाचून मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना कळवले असता ग्रामीण पोलिसांनी तातडीने महावितरण कार्यालयाशी संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली होती मात्र तोपर्यंत तो इसम तेथून निघून गेला. सदरची घटना प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
सुदैवाने त्यावेळी वीजप्रवाह खंडित झालेला असल्याकारणाने मोठा अनर्थ टळला आहे. त्या इसमाचे दैव बलवत्तर होते म्हणून तो वाचला असून काळ आला होता पण वेळ नाही असेच म्हणावे लागेल.





























































