मुलाच्या वयाच्या पुरुषासोबत महिलेचे अनैतिक संबंध, पतीने दिली भयंकर शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाच्या वयाच्या तरुणासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर पतीने महिलेची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे ही घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर सदर पती स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला व त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.

चंद्रपाल असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो गोरखपूरमधील खुर्मपूरमध्ये बस चालवायचा. त्या भागातच चंद्रपाल त्याची पत्नी निलम व दोन मुलांसोबत राहायचा. त्यांचा मोठा मुलगा 25 वर्षांचा होता. निलमचे एका तरुण मुलासोबत अनैतिक संबंध होते. चंद्रपाल जेव्हा कामानिमित्त बाहेर असायचा तेव्हा निलम व तो तरुण त्यांच्या घरी भेटायचे. त्यांच्यातील अनैतिक संबंधांविषयी चंद्रपालला समजले होते. त्यामुळे चंद्रपाल तिच्यावर भडकला होता. त्याने निलमला तिचे सर्व प्रकार बंद करायला सांगितलेले. मात्र ती ऐकत नव्हती. त्यामुळे चंद्रपाल वैतागला होता. अनेकदा चंद्रपालने त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेतही पकडले आहे.

पत्नीच्या या वागण्यामुळे चंद्रपाल फारच अस्वस्थ होता. अनेकदा या मुद्द्यावरुन चंद्रपाल आणि नीलममध्ये भांडणं व्हायची. ती त्याचे काहीही ऐकत नव्हती. त्यामुळे त्याने एक दिवस गाठून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात गेला आणि स्वत:चा गुन्हा कबूल केला.