बर्फाळ नदीत अडकलेल्या श्वानाचे तरुणाने वाचवले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक तरुण बर्फाळ नदीमध्ये डुबकी मारून नदीत अडकेल्या श्वानाचे प्राण वाचवताना दिसत आहे. हा तरुण नदीतील बर्फ तोडून श्वानापर्यंत पोहोचतो आणि त्याला पुन्हा जमिनीवर सुखरूप आणतो, असे या व्हिडीओत दिसत आहे. युक्रेनमधील डोनेक्स भागातील हा व्हिडीओ आहे. बर्फाने गोठलेल्या कॅल्मियस नदीत किनाऱ्यापासून 100 मीटर अंतरावर हा श्वान अडकला होता. अखेर या तरुणाने जिवाची बाजी लावून श्वानाचे प्राण वाचवले. नेटिझन्सने या तरुणाच्या शौर्याला सलाम केला आहे.