
खवले मांजराचे खवले विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे स्वतः कडे बाळगल्याप्रकरणी संगमेश्वर जवळच्या चिखली पंडव वाडीतील एकनाथ महादेव पंडव यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रंगेहात पकडले आहे, असून संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत प्रभाकर बोरकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की , एकनाथ महादेव पंडव , (वय 49 वर्षे , रा . चिखली पांडववाडी) , 8 जुलै 2022 रोजी 4. 45 वा . दरम्यान मौजे संगमेश्वर गोळवली येथील यादववाडी स्टॉप , ता.संगमेश्वर , जि . रत्नागिरी येथे मौल्यवान किंमतीचे, पिशवीतील खवल्या मांजराचे पिशवीसह वजन पाहता 1 किलो 710 ग्रॅम आहे. खवले मांजराची खवले विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे बाळगल्या. याप्रकरणी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . याबाबत अधिक तपास पी.व्ही . देशमुख संगमेश्वर पोलीस ठाणे हे करीत आहेत .



























































