साहित्यिकांचा बहिष्कार; नवे पाहुणे शोधताना आयोजकांची दमछाक

17

सामना प्रतिनिधी । यवतमाळ

नयनतारा सहगल यांच्या अपमानामुळे मान्यवर साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार घातला. त्यामुळे नवे पाहुणे शोधताना आयोजकांची दमछाक होत आहे. उद्घाटनाच्या एक दिवस आधी सकाळी आठ वाजेपर्यंत पोस्टल मैदानावर संमेलन रद्द झाले तर बरे अशीच केविलवाणी अवस्था होती.

– कविसंमेलनाचे अध्यक्ष फ. म. शहाजिंदे, सुचिता खल्लाळ, सुहास जेवळीकर, नामदेव कोळी न आल्यामुळे ऐनवेळी अध्यक्ष शोधण्यासाठी आयोजकांना पळापळ करावी लागली.

– आज सकाळी 11 ते 12 या वेळेत सत्कारमूर्ती विद्या बाळ, चित्रकार भ. मा. परसकाळे न आल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. कृषक समाजाच्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. शरद निंबाळकर, सहभाग घेणारे डॉ. रामप्रसाद तौर, चंद्रकांत वानखडे यांची अनुपस्थिती असल्याने हा कार्यक्रमही विस्कळीत झाला.

– त्यानंतरच्या ‘माध्यमांची स्वायत्तता’ यावर होणाऱया टॉक शोचा गिरीश कुबेर, ज्ञानेश महाराव, प्रा. जयदेव डोळे आणि समन्वयक संजय आवटे न आल्यामुळे फज्जा उडाला. नितीन केळकर यांनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसऱ्या पाहुण्या अपर्णा मोहिले यांनी ऐनकेळी निरोप मिळाल्याने फार काही बोलता येणार नसल्याची कबुली देत आयोजकांची लक्तरे वेशीला टांगली.

– पुस्तक विक्रेत्यांकडे कार्यक्रम पत्रिका आहे परंतु या पत्रिकेतील बहुतेक मोठी मंडळी दिसत नसल्याने रसिकांचा हिरमोड झाला.

आपली प्रतिक्रिया द्या