
सध्या देशात दिवाळीची धूम आहे. कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षं काढल्यानंतर यंदाची दिवाळी खूपच उत्साहात साजरी होत आहे. पण, ही दिवाळी फक्त हिंदुस्थानातच नव्हे तर अनेक देशांमध्ये साजरी होते.
हिंदुस्थानच नव्हे तर नेपाळ, भूतान, मॉरिशस, मलेशिया, सिंगापूर तसंच अनेक आफ्रिकन देशही दिवाळी साजरी करतात. या देशांमध्ये दिवाळीची सुट्टी दिली जाते. दिवाळीच्या सणासाठी राष्ट्रीय सुट्ट्या दिल्या जातात.
या देशांखेरीज फिजी, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांमध्ये देखील दिवाळीची सुट्टी दिली जाते. यामागील मुख्य कारण म्हणजे येथे असलेली हिंदू लोकसंख्या. मोठ्या प्रमाणावर हिंदू नागरिक राहत असल्याने या देशांमध्ये दिवाळी हा मोठा सण म्हणून साजरा केला जातो.
त्याखेरीज आता न्यूयॉर्कमध्येही आता दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्सने या सुट्टीची घोषणा केली आहे. गंमत म्हणजे या देशांमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतींमध्येही थोडा फार फरक पाहायला मिळतो. अत्तर लावून स्नान, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाय, कावळा आणि कुत्र्याची पूजा केली जाते.


























































