
जम्मू-कश्मीरमध्ये कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील वीरजवान शहीद प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवन येथे आयोजित वीरचक्र प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते जंजाळ यांच्या पत्नी व आई यांनी कीर्ती चक्र स्वीकारले. यावेळी त्यांच्या आई व पत्नीला अश्रू अनावर झाले.
#WATCH | Martyr Sepoy Janjal Pravin Prabhakar was posthumously awarded the Kirti Chakra for his extraordinary bravery, indomitable courage and supreme sacrifice in service to the nation.
In an emotional moment, his mother and wife broke down in tears while receiving the honour,… pic.twitter.com/WviFiHkjkf
— DD News (@DDNewslive) June 8, 2026
6 जुलै 2024 रोजी कुलगाम जिल्ह्यातील मोडरगम येथे सहा दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागली व त्यात त्यांना वीरमरण आलं.
प्रवीण जंजाळ हे शहीद झाले तेव्हा त्यांचे वय अवघे 24 वर्ष होते. तसेच त्यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्यांच्या आधी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ आणि काका रवींद्र जंजाळ हे सैन्यदलात होते.





























































