कॉक्रोच जनता पार्टीचे 11 जूनला पुण्यात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोज जनता पार्टी येत्या 11 जूनला विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आंदोलन करणार आहे. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. हे आंदोलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.कॉक्रोच जनता पार्टीचे हे महाराष्ट्रातील पहिले आंदोलन आहे.

धर्मेंद्र प्रधान हे जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या शहरात जाऊन आंदोलन करणार आहोत, अस कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावरून सांगितले आहे.