मुंबईत ठिकठिकाणी निघाली ‘मशाल’ फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी मशाल फेरी काढली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि धगधगती मशाल ही नवी निशाणी मुंबई करांच्या घराघरात पोहचवण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला असून त्यासाठीच बाईक रॅली आणि पदयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांची व निष्ठsची मशाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपविभागप्रमुख कृष्णा पवळे यांनी रविवारी बाईक रॅली आयोजित केली होती. हजारो रहिवाशांनी रॅलीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि त्यात सहभागी झाले. निष्ठावंत मुस्लिम शिवसैनिक सलीम कादर यांनी निष्ठsची मशाल बॅकबे डेपो ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ापर्यंत नेत सर्वधर्म समभाव आणि एकतेचे दर्शन घडवले. या रॅलीत विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, शाखाप्रमुख महेंद्र कांबळे, संतोष पवार, संतोष वीर, मनोहर पाटील आदी सहभागी झाले होते.

भायखळा विधानसभा क्षेत्रातील लव्ह लेन शाखा येथून शिवसेना-युवासेनेसह संलग्न सर्व संघटनेच्या आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत ‘धगधगती मशाल’ फेरी काढण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर, विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक मंगेश बनसोड, माजी नगरसेवक/प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे, उपविभागप्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, महिला आघाडीच्या सुरेखा राऊत, चंदना साळुंखे, उषा पाटोळे, विजया वाळुंज, कीर्ती शिंदे, युवासेनेचे विराज बनसोड, चेतन थोरात, अमित जाधव, ओंकार पाटील, विभा मोरे आदी उपस्थित होते.