चटपटीत भेळपुरीवर ऑस्ट्रेलियाचे मास्टरशेफ फिदा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिखट, चटपटीत भेळपुरीचा नुसता उल्लेख जरी केला तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अगदी झटपट तयार होणारी आणि पोट भरून टाकणारी भेळपुरी अनेकांना आवडते. स्ट्रीट फूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हिंदुस्थानी पदार्थाची चर्चा आता ऑस्ट्रेलियात रंगलेय. ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या परीक्षकांनाही भेळपुरीची भुरळ पडलेय.

 ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’ची स्पर्धक सारा टॉडने भेळपुरीला स्नॅक्स डिश म्हणून सादर केल्यानंतर भेळपुरी ट्रेंडिंगमध्ये आली आहे. साराने हिंदुस्थानी पाककृती बनवून परीक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. साराने इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली.

स्पर्धेत साराने 10 मिनिटांत भेळपुरी बनवण्याचे ठरवले. तिने केलेली भेळ आणि तिचा स्वाद परीक्षकांना आवडला आणि त्यांनी साराचे भरपूर कौतुक केले. या सोप्या, पण चटकदार पदार्थाच्या प्रेमात ऑस्ट्रेलियाचे शेफ पडले आहेत आणि याचीच सोशल मीडियावर चर्चा आहे.