अंबाजोगाईत व्यापाऱ्याची ५ लाखाची बॅग लांबवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई

जिल्ह्यात परळी, बीड या ठिकाणी बॅग लिप्टींगच्या घटनांचे सत्र सुरू असतांना आज मंगळवारी अंबाजोगाईतही अशीच घटना घडली. एका व्यापाऱ्याने कारमध्ये ठेवलेली तब्बल पाच लाखाची रक्कम अज्ञात चोरट्याने वाहनाची काच फोडून चोरून नेली. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शहरातील अत्यंत वर्दळीच्या प्रशांतनगर परिसरात घडली.

अंबाजोगाई येथील लोहिया पान मटेरियल या व्यापाऱ्याचे दुसरे एकच व्यापारी नातेवाईक आज कामानिमित्त अंबाजोगाईत आले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते कार घेवून बसस्थानकाच्या पाठीमागील प्रशांतनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी त्यांची पाच लाखाची रक्कम कारमध्ये ठेवली होती. कामानिमित्त ते जवळच गेलेले असतांना अज्ञातांनी कारची काच फोडून आतील रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट दिली.