एमजीची ‘ग्लॉस्टर’ आली

एमजी मोटर इंडियाने आज पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयूव्ही ग्लॉस्टर सादर केली आहे. देशातील पहिली इंटरनेट इलेक्ट्रिक एसयूव्ही झेडएस इव्हीनंतर ग्लॉस्टर हे एमजीचे तिसरे बहुप्रतिक्षित उत्पादन आहे. एमजी ग्लॉस्टर ही या सेगमेंटमधील पहिली अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम आहे. यात अडाप्टिव्ह क्रुस कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट आहे. यात फॉरवर्ड कोलायजन वार्मिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन अशी वैशिष्ट्ये आहेत.ग्लॉस्टरमध्ये 118 पीएस पॉवरचे 2.0 डिझेल ट्विन टर्बाे इंजिन आणि 480 एनएमटोर्क, 12.3 इंच एचडी टचस्क्रीन, 64 कलर अँबिएंट लायटिंग आणि पॅनोरमिक सनरुफ असून यामुळे ही या कॅटेगरीतील सर्वात पॉवरपुâल एसयूव्ही असेल. अवघ्या 1 लाख रुपयांत या कारची बुकिंग करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या