
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करारासाठी ‘यूपीए’च्या कोणत्याही नेत्यांना आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना लाच दिली नाही, असे ब्रिटिश दलाल ख्रिस्तयन मायकल याने सीबीआय अधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ऑगस्टा वेस्टलँडकडून कन्सलटन्सी फी घेतली असा दावाही त्याने केला आहे. मायकल सध्या सीबीआय कोठडीत आहे. सीबीआय अधिकाऱ्यांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
काय म्हणाला मायकल?
एक हस्तलिखित चिठ्ठी सीबीआयला मिळाली आहे. मायकलने सांगितले, ही चिठ्ठी युरोपीय दलाल गाइडो हाशके याने लिहिली आहे. गाइडो हाशकेने लिहिले आहे, ‘व्हीव्हीआयपी चॉपर डीलमध्ये सोनिया गांधी मुख्य आहेत. त्यामुळे हिंदुस्थानातील ऑगस्टा वेस्टलँडचे मुख्य सेल्समन पीटर हुलेट यांनी सोनिया गांधी यांच्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी, अहमद पटेल यांना टार्गेट करायला हवे.’ मला हाशकेने फसवल्याचेही मायकल म्हणाला.




























































