
काहीतरी रोमांचक करण्याचं, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात कोण काय करेल, याचा नेम नसतो. मग भलेही त्यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजण्याची तयारी असते. असाच काहीसा प्रकार सध्या Mile High Club नावाने धुमाकूळ घालत आहे.
Mile High Club नावाची ही संज्ञा उंचावर ठेवल्या जाणाऱ्या शारीरिक संबंधांसाठी वापरली जाते. उडत्या विमानात सेक्स करणारे लोक स्वतःला Mile High Clubचा सदस्य मानतात. या अनौपचारिक क्लबमध्ये सामील होण्यासाठी एका तरुणीने हजारो रुपये मोजले आहेत.
या तरुणीचं नाव कजुमी स्क्वीटर्स असं आहे. कजुमी ही अमेरिकेतली फ्लोरिडाची रहिवासी आहे. व्यवसायाने मॉडेल असलेल्या कजुमीने अमेरिकेच्या लास वेगास शहरावरून उडताना आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवले.
यासाठी तिने विमानं भाड्याने देणाऱ्या कंपनीच्या मिनतवाऱ्या केल्या. तेव्हा त्या कंपनीने तिला विमान भाड्याने दिलं. अवघ्या 45 मिनिटांच्या फ्लाईटसाठी तिने 74 हजार रुपये मोजले. तिच्या म्हणण्यानुसार हा अनुभव खूपच रोमांचक होता. तिने तिचे काही खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचाही प्रयत्न केला.
अमेरिकेत Mile High Clubचं वेड वाढताना दिसत आहे. कारण अशा प्रकारे जोडप्यांना विमानं भाड्यावर देणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ होत आहे. जर विमानात लग्न करण्याचा बेत असेल तर अशा जोडप्याला 89 हजार रुपये मोजावे लागत असून 7400 रुपयांना जेवण उपलब्ध करून दिलं जात आहे.



























































