
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त नव्हते तर ते शेतकऱ्यांचे फोन घेत असतील. तसेच ड्रायफ्रूट्स खाणाऱ्या नेत्यांना मधुमेहाचा त्रास असेल. त्यामुळे त्यांनी ते मागवून खाल्ले असावेत. त्यात आपल्याला काहीही चुकीचे वाटत नाही, असा अजब दावा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केला.
अकोल्यामध्ये पृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीत उपस्थित असलेले अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले होते. तर दुसरीकडे नांदेडमध्ये भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीत नेतेमंडळी आणि अधिकारी काजू-बदामावर ताव मारत होते. सर्व स्तरातून सत्ताधारी नेत्यांसह अधिकाऱ्यांवर जोरदार टीका होत आहे.

























































