शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

eknath-shinde

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…

आपली प्रतिक्रिया द्या