भयंकर! घरात झोपलेल्या मुलीचं अपहरण आणि सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । फरीदाबाद

घरात झोपलेल्या एका 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना फरीदाबाद येथे घडली आहे. त्याहूनही भयंकर म्हणजे ही घटना त्या मुलीसोबत दोन वेळा घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या शेजारी राहणारा तरुण आणि त्याच्या तीन साथीदारांवर आरोप करण्यात आला आहे. सध्या ही मुलगी अतिशय गंभीर अवस्थेत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. घरात झोपलेल्या या मुलीचं तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने अपहरण केलं. मुलगी ओरडू नये म्हणून त्याने तिच्या तोंडात कपडा कोंबला होता. तिच्या घराबाहेर पडल्यानंतर त्या तरुणाने तिला एका पांढऱ्या गाडीत टाकलं आणि तिथून दूर निघून गेले. गाडीतच तिच्यावर चार जणांनी पाशवी बलात्कार केला. संपूर्ण रात्रभर मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर सकाळी आरोपींनी तिला तिच्या घराजवळील रस्त्यावर फेकलं आणि ते फरार झाले. मुलीने घर गाठत आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी ताबडतोब पोलिसात तक्रार केली.

या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मुलीसोबत 12 नोव्हेंबर रोजीही असाच प्रकार घडल्याचंही समोर येत आहे. 12 नोव्हेंबरच्या रात्रीही तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली होती. त्यामुळे पीडिता गप्प राहिली. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पीडितेची प्रकृतीही गंभीर असून तिला जबर मानसिक धक्काही बसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.