
कांजूरवासीयांना झणझणीत आणि चमचमीत मिसळीचा आस्वाद घेता येणार आहे. विक्रोळी विधानसभेच्या वतीने शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कांजुरमार्ग पूर्व येथे भव्य मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. 29 मेपर्यंत चालणाऱया या महोत्सवात महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नाशिक आदी ठिकाणच्या प्रसिद्ध मिसळींची चव खवय्यांना घेता येणार आहे. त्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे. याप्रसंगी आमदार सुनील राऊत यांच्यासह विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर, महिला विभाग संघटक संध्या वढावकर, माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेवक सुवर्णा करंजे, उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख शेखर जाधव, अनंत पाताडे, विधानसभा संघटक परम यादव, संदीप सावंत यांच्यासह विभागातील सर्व पुरूष व महिला पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक आदी उपस्थित होते.





























































