कोरियन यूटय़ुबरची छेड काढणाऱया दोन मुस्लिम तरुणांच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फूडच्या ब्लॉगसाठी खार येथे आलेल्या कोरियन यूटय़ुबरची छेड काढणाऱया दोघांना खार पोलिसांनी अटक केली. मोबीन शेख आणि मोहमद अनसीर अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे खार परिसरात कपडे विक्रीचे काम करतात.

कोरियन तरुणी ही काही महिन्यापूर्वी मुंबईत आली होती. ती यूटय़ुबवर फूड ब्लॉग अपलोड करते. दोन दिवसांपूर्वी तरुणी ही खार पश्चिम परिसरात आली. सद्गुरू हॉटेल येथे ती व्हिडीओ बनवत होती. तेव्हा मोबीन आणि मोहमद तिकडे आले आणि त्या दोघांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. त्यामुळे ती तरुणी घाबरली. तिने तो व्हिडीओ ट्विटवर अपलोड केला.

त्या व्हिडीओची दखल घेऊन खार पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक मोहन माने यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक वैभव काटकर, सहाय्यक निरीक्षक अविनाश नडविणकेरी आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी पटेल नगर येथून मोबीन आणि मोहमदला ताब्यात घेतले.