
हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. इंडेक्स प्रोव्हायडर एमएससीआय (मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल)ने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या फ्री फ्लोटची रक्कम घटवली आहे. फ्री फ्लोटचा अर्थ बाजारातील सर्व भागधारकांजवळ असलेल्या शेअर्सच्या तुलनेतील जागतिक भागधारकांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सची संख्या होय.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एमएससीआयच्या अनेक भागधारकांनी त्यांच्या जागतिक पातळीवरच्या गुंतवणूक योग्य मार्केट इंडेक्सकडे अदानी समूहाशी संबंधित सिक्युरिटीज आणि फ्री फ्लोटच्या किंमत निर्धारणासंबंधी प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. त्यात या गुंतवणूकदारांपैकी काहींनी गुंतवणुकीसाठी अनिश्चितता दर्शवली होती. त्यामुळे अदानीच्या चार कंपन्यांचं फ्री फ्लोट डेजिग्नेशन घटवण्याचा निर्णय एमएससीआयने घेतला आहे.
त्याची परिणती अदानी समूहाची जागतिक गुंतवणूक घटण्यात झाली आहे. अदानी समूहातील 8 कंपन्या या एमएससीआयशी जोडलेल्या आहेत. त्यातील चार कंपन्यांचं फ्री फ्लोट वेटेज घटवण्यात आलं आहे. या कंपन्यांमध्ये अदानी एन्टरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, एसीसी लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.
























































