
फायनान्स कंपनीकडून कर्ज घेताना गहाणखत करून दिलेला प्लॉट परस्पर विक्री केल्याप्रकरणी विक्री करणारा आणि खरेदी करणारा अशा दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजेश त्र्यंबक रुमणे शाखा अधिकारी श्रीराम फायनान्स यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, गणेश गोविंदराव लोकडे (रा. पाखरसांगवी ) यांनी फायनान्स कंपनीकडून 2 लाख रुपये कर्ज घेतले होते. पाखरसांगवी शिवारातील जमीन गट क्रमांक 17 मधील प्लॉट क्र.06 हा गहाणखत करून दिला होता. कर्जाची रक्कमही त्यांनी भरली नाही. दुय्यम निबंधक कार्यालयात गहाणखत केलेल्या प्लॉटसंदर्भात चौकशी केली असता तो प्लॉट अनिता सिध्देश्वर मोरे (रा. गणेश नगर) यांना परस्पर गणेश लोकडे यांनी विक्री करून फायनान्स कंपनीची फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































