
मुंबईतील सर्वसामान्यांना घराजवळच वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रात आतापर्यंत तब्बल अडीच महिन्यांत तब्बल 2 लाख 30 हजार गोरगरीबांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
1 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे कशी फायदेशीर आहेत?
मुंबईतील गोरगरीबांना घराजवळ दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ 106 आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील सर्वसामान्यांना विशेषतः झोपडपट्टी भागातील रहिवाशांना मोफत आणि घराजवळ अद्ययावत उपचार मिळत आहेत. या ठिकाणी विविध प्रकारच्या 147 चाचण्या मोफत केल्या जात आहेत. ही आरोग्य केंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे कामावरून उशिरा घरी येणाऱ्या सर्वसामान्यांनाही मोठा फायदा होणार आहे.
2 या ठिकाणी आणखी नव्या कोणत्या सुविधा सुरू करणार?
मुंबईत 34 टक्के नागरिकांमध्ये हायपरटेन्शन असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या उत्तम प्रकृतीसाठी पालिकेच्या माध्यमातून घरोघरी डायबेटीस आणि हायपर टेन्शन तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत ज्यांच्यामध्ये कोणत्याही आजाराची लक्षणे असल्यास औषधोपचाराचा सल्ला आणि औषधोपचारही सुरू करण्यात येत आहे. तर आता पालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य पेंद्रांमध्ये हायपर टेन्शन आणि डायबेटीस तपासण्यात येणार आहे.
3 या उपक्रमाचा आणखी फायदा कसा होणार?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र, घरोघरी होणारी डायबेटीस, हायपर टेन्शन तपासणी या दोन महत्त्वाकांक्षी योजनांमुळे मुंबईकरांच्या आरोग्याची ‘पुंडली’च तयार होणार आहे. शिवाय या उपक्रमांमुळे सर्वसामान्यांना घराजवळ, वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणार असल्याने आजार वाढणार नाही. शिवाय पालिकेच्या मोठय़ा रुग्णालयांवरील ताणही कमी होणार आहे.





























































