मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या अभिनेत्रीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे तसेच ड्युटीवरील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री काव्या थापर हिला अटक केली आहे. जेडब्ल्यू मेरियट हॉटेलजवळ रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अटकेनंतर पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kavya Thapar (@kavyathapar20)

काव्या ही एका पार्टीवरून घरी परतत होती. पार्टीत ती दारु प्यायली होती. तिच्यासोबत तिचा एक मित्रही होता. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना काव्याने तिची गाडी एका गाडीला ठोकली. त्यानंतर निर्भया पथकचे अधिकारी तिथे पोहोचले. महिला पोलिसांनी काव्याला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने तिची कॉलर पकडून धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तिच्या धक्क्यामुळे महिला पोलीस रस्त्यावर पडली. याप्रकरणी काव्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला सध्या भायखळा महिला तुरुंगात ठेवण्यात आले आहे.