कोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती

कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम घराघरात राबवायला सुरुवात केली असून मुंबईत या मोहिमेसाठी जोरदार जनजागृती सुरू आहे. या मोहिमेंतर्गत 60 लाख परिपत्रके, रस्त्यारस्त्यावर 735 मोठय़ा हार्ंडग्जसह घोषवाक्ये, वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ यावर जाहिरातींबरोबरच पालिकेच्या सोशल मीडियावर जोरदार जनजागृती केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि कर्मचारी तसेच पोलीस, डॉक्टर, आरोग्यसेवक, बेस्ट कर्मचारी धोका पत्करून आपापले कर्तव्य बजावत आहेत. कोरोना योद्धय़ांकडून अहोरात्र कर्तव्य पालन सुरू असतानाच कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. यात प्रत्येक घराघरात दोन वेळा तपासणी करून कोरोनाला आळा घातला जाणार आहे.

‘एक वचन, तीन नियम’वर भर

  • राज्य सरकारची ही मोहीम प्रत्येक मुंबईकरांपर्यंत पोहोचावी, यासाठी पालिकेने मुंबईतील रस्त्यारस्त्यावर ‘एक वचन, तीन नियम – मास्क वापरा, हात धुवा, अंतर ठेवा!’ अशी घोषवाक्ये असणारी मराठी आणि इंग्रजीमध्ये हार्ंडग उभारली असून यात मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरण्याचे आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे त्याचबरोबर घराबाहेर आणि घरात परतल्यानंतर वेळोवेळी हात धुवा, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये 735 मोठी हार्ंडग लावली जाणार आहेत. यात वॉर्डरूमची माहिती देणारे 125 होर्डिंग्ज आहेत तर ‘एक वचन, तीन नियम’ या घोषवाक्यासह मराठी आणि इंग्रजीमध्ये पाठपोठ स्वरूपात 30 लाख माहितीपत्रके छापण्यात येणार आहेत. त्यातील 16 लाख 20 हजार प्रती छापून झाल्या असून त्यातील 4 लाख प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.
  • मुंबईकरांनी काळजी कशी घ्यावी तसेच वॉर्डरूमचे संपर्प क्रमांक असे पाठपोठ स्वरूपात असलेल्या रंगीत माहितीपत्रकांच्या 30 लाख प्रती छापण्यात येत आहेत. यातील 21 लाख प्रती छापल्या असून त्यातील 14 लाख माहितीपत्रके लोकांपर्यंत पोहोचली आहेत.
  • मुंबईतील 2,575 बस थांब्यांवर जाहिराती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
  • मुंबईतील 4 रेडिओ वाहिन्यांवरून ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची जिंगल्स स्वरूपात जाहिराती 9 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत.
  • विविध मराठी वृत्तवाहिन्यांवर तळटीप संदेश (स्क्रोल्स)च्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
  • मुंबईकरांशी थेट संवाद साधण्यासाठी पालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांच्या मुलाखती वृत्तवाहिन्या, रेडिओ वाहिन्यांवर प्रसारित करण्यात आल्या आहेत.
  • जनजागृतीसाठी मराठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या सोशल मीडियावरूनही जनजागृती मोहीम करण्यात येत आहे.
  • जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून या मोहिमेसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी पालिकेने पर्यावरणमंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती केली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या