मुंबई-गोवा महामार्गावर माणगावनजीक भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथे पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. गाडी आणि ट्रक समोरसमोर धडकून हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.

माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. येथे महामार्गावर विरुद्ध बाजूने येणारा ट्रक समोरून येणाऱ्या इको गाडीला धडकल्याने ही दुर्घटना घडली. या टकरीनंतर गाडीचा संपूर्ण चक्काचूर झाला. तर गाडीतील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात एक चार वर्षांचा मुलगा जखी झाला आहे. गोरेगाव पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केलं आहे.