46,414 धावपटू धावणार; मुंबई मॅरेथॉनची रंगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जगभरातील अव्वल धावपटूंसह उद्या तमाम मुंबईकर रस्त्यांवर धावतील. निमित्त असेल मुंबई मॅरेथॉनचे. दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 46,414 धावपटू धावणार आहेत. हिंदुस्थानसह जगभरातील स्टार धावपटू कडाक्याच्या गुलाबी थंडीत उद्या नव्या विक्रमावर मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झालेत. एलिट मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा केनिया व इथियोपिया या खेळाडूंचाच बोलबाला दिसून येईल यात शंका नाहीय.

 एण्ड नव्या ठिकाणी

यंदा मुंबई मॅरेथॉनमधील विविध प्रकारांतील शर्यतींचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे होणार नाहीए. शर्यतींची सुरुवात सीएसएमटी येथून होणार असली तरी मेट्रोच्या कामामुळे शेवट हा हजारीमल सोमाणी मार्ग येथे होणार आहे. एलिट मॅरेथॉनचा शेवट फक्त सीएसएमटी येथे होणार आहे.

शर्यतींची वेळ, ठिकाण व शेवट

प्रकार       वेळ  सुरुवात       शेवट

ऍमॅच्युअर    5.30            सीएसएमटी    हजारीमल सोमाणी

हाफ          5.30            वरळी डेअरी   हजारीमल सोमाणी

10के          6.20            सीएसएमटी    हजारीमल सोमाणी

एलिट        7.20            सीएसएमटी    सीएसएमटी

1.5किमी    7.25            सीएसएमटी    एम. जी. रोड

सीनियर सीटीजन 7.50     सीएसएमटी     मेट्रो

ड्रीम रन      8.15            सीएसएमटी     मेट्रो

या खेळाडूंवर असणार नजरा

पुरुष

  • अबेरा कुमा (इथियोपिया)
  • जेकब केनडॅगोर(केनिय)
  • एलिजा केम्बोई (केनिया)

महिला

  • अमाने गोबेना (इथियोपिया)
  • डिंकनेश मेकाश (इथियोपिया)
  • शुको जेनेमो (इथियोपिया)

वैद्यकीय व्यवस्था

मेडिकल स्टेशन ः 12

रुग्णवाहिका     ः 11

डॉक्टर्स          : 600

बिस्लेरी वॉटर स्टेशन्स : 27

विक्रम मोडीत निघणार?

मुंबई मॅरेथॉनला गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडाप्रेमींचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीए. मात्र या शर्यतीत जगभरातील अव्वल धावपटू धावत असल्यामुळे विक्रम मोडीत निघाल्यास आश्चर्य वाटायला नको. केनियाच्या गिडीयॉन किपकेटरने 2016 साली 2.08.35 या विक्रमी वेळेसह पुरुषांची मॅरेथॉन जिंकली होती. महिला गटात केनियाच्याच वॅलेण्टाइन किपकेटर हिने 2013 साली 2.24.33 अशा विक्रमी वेळेसह जेतेपदावर मोहोर उमटवली. आता या दोघांचा विक्रम यंदा मागे पडणार का, या प्रश्नाचे उत्तर उद्याच मिळेल.

marathon-contestantसुधा, ज्योती, मोनिकाकडून अपेक्षा
हिंदुस्थानी गटात सुधा सिंग, ज्योती गवाते व मोनिका राऊत या मुलींकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. पुरुष गटात गोपी थोनाकल, नितेंद्र रावत, करण सिंग यांना आपली धमक दाखवावी लागेल.