
पालिकेच्या विद्यार्थ्यांना आरामदायी बैठक व्यवस्था मिळावी, पाठदुखीचा त्रास टळला जावा यासाठी आरामदायी बेंच खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी पालिका पहिल्या टप्प्यात 19 हजार हजार बेंच खरेदी करणार आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. तसेच मोफत बससेवा उपलब्ध करण्यात येते. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ‘मिशन अॅडमिशन’अंतर्गत गेल्या वर्षी एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने सध्या विद्यार्थी संख्या चार लाखांवर पोहोचली आहे. विद्यार्थी संख्येत वाढ झाली असली तरी आसन व्यवस्था जुनी आहे. त्यामुळे नवीन रचनेचे बेंच घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खुर्ची राहणार आहे.





























































