बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयातील जेस्पा या सिंहाचा आज वयाच्या 11व्या वर्षी मृत्यू झाला. जेस्पाचा जन्म उद्यानातच 22 सप्टेंबर 2011 रोजी शोभा आणि रवींद्र नावाच्या सिंहापासून झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून जेस्पा आजारी होता. त्याच्यावर सुरू अ्सलेल्या उपचाराला त्याने साथ दिली नाही. अवयव निकामी झाल्याने आणि अशक्तपणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, असे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे.