
ऑनलाईन फसवणुकीच्या गुह्यांतील एका आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. दिनेश यादव असे या आरोपीचे नाव आहे.
बोरिवली येथे राहणारी तक्रारदार महिला शिक्षिका आहे. ऑक्टोंबर महिन्यांत तिला एका अज्ञात व्यक्तीने घरबसल्या चांगल्या कमिशनवर जॉब देण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर ऐकल्यांनतर तिने त्यास होकार दिला होता. त्यानंतर तिला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये समावेश करुन तिथे तिला प्रोडक्ट लाईक करण्याचे टास्क देण्यात आले होते. सुरुवातीला या टास्कवर चांगले कमिशन मिळत होते. मात्र नंतर प्रत्येक टास्कसाठी तिला काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.जास्त कमिशनच्या नादात तिने विविध प्रिपेड टास्कसाठी 7 लाख 52 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र भामटयांनी तिची पद्धतशीर फसवणुक केली. होती. याप्रकरणी तिने तक्रार दिल्यानंतर बोरीवली पोलिसांनी दिनेश यादव या सायबर भामटयाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या सहकाऱयाचा पोलिस शोध घेत आहेत.



























































