#MumbaiRains मुंबईची झाली तुंबई! सोशल मीडियावर फोटो शेअर करत मुंबईकरांनी सरकारला फटकारलं

रविवार रात्रीपासून मी मी म्हणत कोसळणाऱ्या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत कोसळणाऱ्या पावसानं आणि अनेक भागात तुंबलेल्या पाण्यानं मुंबईकरांना घरातून बाहेर पडणं देखील अशक्य झालं. मग संतप्त नागरिकांनी आपल्या परिसरातील फोटो, व्हिडीओ X हँडलवर पोस्ट करत सरकारला झोडपून काढलं. लोकसभा निवडणुकीच्याकाळात मिंधे सरकारनं केवळ निवडणुकांवर लक्षं केद्रीत केल्यानं मुंबईत पावसाळ्या पूर्वीची कामं, नाले आणि गटारं साफ करणं या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यानंच मुंबईकरांना त्याचा फटका बसत असल्याचा आरोप होत आहे. अनेकांनी मुंबई महापालिकेला फोटो व्हिडीओ टॅग करून जाब विचारला आहे.