निवडणुकीच्या तोंडावर पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या मुलाच्या कंपनीचा एक भागीदार अरब तर दुसरा भागीदार पाकिस्तानी असल्याचा गौप्यस्फोट करतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर पुलवामासारखा दहशतवादी हल्ला घडवला जाईल अशी भीती व्यक्त केली. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफानी हल्ला चढवला.

मोदी यांचे मेक इन इंडिया, दोन कोटी लोकांना रोजगार व स्टार्ट अप या योजना अपयशी ठरल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. पंजाब, गोव्याच्या निवडणुकीआधी उरीचा हल्ला झाला होता. आता देशातील लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल असे राज ठाकरे म्हणाले. दहा माणसे जरी एअर स्ट्राईकमध्ये मारली गेली असती तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान परत आला नसता असेही ते म्हणाले.