स्टॅम्प डय़ुटीतील कपात बांधकाम व्यवसायासाठी गेम चेंजर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या महामारीनंतर रिअल इस्टेट क्षेत्राला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने केलेली स्टॅम्प डय़ुटीतील कपात या क्षेत्राच्या पुनरुज्जीवनात गेम चेंजर ठरली आहे. स्टॅम्प डय़ुटी कपातीचा परिणाम म्हणजे मुंबईत घरखरेदीसोबतच पुण्याच्या प्रॉपर्टी मार्पेटमध्येही वाढ झाल्याची माहिती नरेडकोने दिली आहे.

नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष अशोक मोहनानी म्हणाले, अलिकडच्या काळात महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे शहराचे रिअल इस्टेट मार्पेट उंचावले आहे. मुद्रांक शुल्काचा लाभ घेण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक असून घर खरेदीसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण यामुळे घर खरेदीदारांना कमी स्टँप डय़ुटी तसेच सर्वात कमी व्याजदरासह त्यांचे स्वप्नवत घर खरेदी करण्याची संधी मिळेल.

अशोक मोहनानी पुढे म्हणाले, रिअल इस्टेट उद्योगाच्यावतीने आम्ही सरकारला विनंती करतो की मुद्रांक शुल्क कपात ही आणखी सहा महिन्यांनी वाढवावी, जेणेकरून आम्ही घर खरेदीदारांना त्यांच्या स्वप्नातील घरांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करू शकू.