मुंबईत तापमानाची ‘विशी’, गार-गुलाबी थंडीने मुंबईकर सुखावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आता थंडी पडण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत गुलाबी थंडीने प्रवेश केला असून तापमान तीन अंशाने घसरले आहे. सांताक्रूझ हवामान विभागाने मंगळवारी 20.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. सर्वसामान्य तापमानापेक्षा 1.8 अंश सेल्सियनए तापमान घसरल्याने मुंबईकरांनी आपले स्वेटर बाहेर काढले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी किमान 23.4 तापमानाची नोंद झाली होती. त्यात घसरण होऊन तापमान 21 अंशावर आले होते. सोमवारी घाटकोपरमध्ये काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पाडले होते, तेव्हा त्यांना थंडी जाणवली. परंतु ते जेव्हा पुन्हा दुपारी बाहेर पडले तेव्हा त्यांना ऑक्टोबरप्रमाणे उन्हाचे चटके नाही लागले. दुपारीही हवेत गारवा असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.

सामान्य तापमानापेक्षा 0.3 अंश सेल्सियस तामपान घसरले असून कुलाबा वेधशाळेने 23.5 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद केली आहे. सोमवारी सर्वात कमी म्हणजेच 19.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. 70 वर्षापूर्वी 19 नोव्हेबर 1950 रोजी 13.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. तर 2012 साली नोव्हेंबर महिन्यात 14.6 अंश सेल्सिय्स तापमनाची नोंद झाली होती.

मंगळवारी कुलाब्यात ६0 टक्के तर सांताक्रूझमध्ये 56 टक्के सापेक्ष आद्रता होती. गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे शहरातील तापमान 37 वरून 33 अंशावर घसरले होते. सोमवारी हे तापमान अजून कमी होऊन 23 अंशावर आले होते.