
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे विद्यापीठाला 76 परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या असून 27 परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर लवकरच जाहीर करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाने 22, 23 क 24 एप्रिल 2019 या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच 29 क 30 एप्रिल 2019 या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यानुसार वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या 30, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या 17, तर आंतरविद्या शाखेच्या 29 परीक्षा अशा एकूण 76 परीक्षा वरील पाच दिवशी आयोजित करण्यात आल्या होत्या, मात्र निवडणुकीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
निवडणुकीमुळे 27 परीक्षांच्या केळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. यातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या 4, विणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या 5 व आंतरविद्या शाखेच्या 18 परीक्षा असून या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. म्हणजेच या परीक्षा निवडणुकीपूर्वी सुरू होणार आहेत. यातील काही पेपर हे निवडणुकीच्या तारखेदरम्यान येत असल्याने तेवढय़ाच पेपरचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.



























































