
तब्बल चार वर्षांपूर्वी खून करून पळून गेलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात कोयनानगर पोलिसांना अखेर यश आले आहे. बाबू शिकाप्पा मसबिनाल (वय 25, रा. नवापूर, बसवन, बागेवाडी, जि. विजापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला कर्नाटक राज्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पाटण न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्हा अभिलेखाकरील फरारी आरोपींना पकडण्याकामी विशेष मोहीम राबवून आरोपी अटक करण्याबाबत सातारा जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांना आदेश देण्यात आले होते. 21 सप्टेंबर 2019 रोजी कोयनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाती मृत्यू भासवून खून केल्याबाबत आरोपींविरुद्ध त्यावेळी कोयनानगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात कर्नाटक भागातील आरोपींचा असलेला सहभाग निष्पन्न करून त्यावेळी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांचे साथीदार मात्र आजअखेर फरारीच होते. या गुन्ह्यातील फरार असलेला बाबू शिकाप्पा मसबिनाल याच्याबाबत माहिती प्राप्त करून त्याला कर्नाटक राज्यात जाऊन ताब्यात घेण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायककाड, हकालदार चक्हाण, घोलप, गकाले, कॉन्स्टेबल पाटील या पथकाने ही कारवाई केली आहे.



























































