ड्रग्जचे इंजेक्शन देऊन बोगस डॉक्टरचा ३४ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। मुझफ्फरपूर

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील शेल्टर होम मध्ये विद्यार्थिनींची नियमित तपासणी करण्यासाठी येणाऱ्या बोगस डॉक्टरने 34 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्विनी असे त्याचे नाव असून तो मुलींना ड्रग्जचे इंजेक्शन द्यायचा त्यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा. या नराधम डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

मुझफ्फरपूर येथील कुरहनी ब्लॉकमध्ये या बोगस डॉक्टरचा दवाखाना आहे. तसेच तो सेवा संकल्प विकास समिती शेल्टर होममध्येही तो विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करायचा. या शेल्टर होममधील 5 मुलींचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर शेल्टर होममधील 7 ते 17 वयोगटातील 34 मुलींवर बलात्कार झाल्याचे समोर आले. दरम्यान या शेल्टर होमचा संचालक ब्रजेश ठाकुर हा याप्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याच्याच सांगण्यावरून मुलींचे लैंगिक शोषण व्हायचे असे तपासात स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी मुंबईच्या टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सने सरकारला एक अहवाल दिला होता. त्यानंतर ठाकुरसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर या शेल्टर होमला टाळे ठोकण्यात आले.त्यानंतर याप्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी शिफारस सरकारने न्यायालयाला केली होती.